Home क्राईम संतापजनक! आई व मुलानेच केली बापाची हत्या, नात्याला काळीमा फासणारी घटना

संतापजनक! आई व मुलानेच केली बापाची हत्या, नात्याला काळीमा फासणारी घटना

Nashik Crime News: मुलगा आणि पत्नीने मिळून ३९ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

Mother and the Son Murder the Father, an incident that Casts a pall over the relationship

नाशिक: नाशिकमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये मुलगा आणि पत्नीने मिळून ३९ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  नाशिकमध्ये एक नात्याला हादरवून टाकणारी घटना घडली असून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुनील गवळी (वय 39) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

आज रात्री (१० जुलै) राहत्या घरी झोपले असताना पत्नी आणि मुलांनी लोखंडी रॉड डोक्यात घालून सुनील गवळी यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

हत्या करणारे मुख्य आरोपी पत्नी आणि मुलाला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत  पोलिस अधिक तपास करत आहे. मृत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Web Title: Mother and the Son Murder the Father, an incident that Casts a pall over the relationship

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here