Home सातारा पिता-पुत्राचा धक्कादायक अंत; रात्री आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर काही तासांतच…

पिता-पुत्राचा धक्कादायक अंत; रात्री आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर काही तासांतच…

Satara News: रात्री आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर काही तासांतच पिता पुत्रांचा मृत्यू (die) झाल्याची घटना घडली आहे.

Father and son die within hours after drinking Ayurvedic extract at night

सातारा : फलटण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हणमंतराव पोतेकर व अमित पोतेकर या पितापुत्रांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सर्वांनी आयुर्वेदिक काढा प्यायला. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. मात्र अचानक मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित आणि मुलीला त्रास जाणवू लागला. रात्रीत तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पितापुत्राचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फलटण शहरात गजानन चौक येथे राहणारे हणमंतराव रामभाऊ पोतेकर (वय ५५) व त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय ३२ ) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी प्यायल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित, मुलगी अशा तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना रात्रीत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पहाटे हणमंतराव पोतेकर व त्यानंतर १५ मिनिटांनी अमित पोतेकर यांचे निधन झाले.

दरम्यान, हणमंतराव यांच्या मुलीची तब्येत सुधारली असून, या पितापुत्रांचा नक्की मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समजू शकलेले नाही. विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. या पितापुत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

Web Title: Father and son die within hours after drinking Ayurvedic extract at night

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here