५२ वर्षांच्या काकाने केले तरुण पुतणीवर अत्याचार
Crime News: ५२ वर्षांच्या काकाने आपल्या तरुण पुतणीवर चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार (abused) केल्याची घटना.
मुंबई : वडिलांच्या निधनानंतर आधार द्यायच्या ऐवजी ५२ वर्षांच्या काकाने आपल्या तरुण पुतणीवर चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार केले. इतकेच नव्हे, तिचे विवस्त्रावस्थेत व्हिडीओ, फोटो काढून तिच्या अंगावर जळता कापूर टाकण्याचा विकृतपणा केल्याचा प्रकार वरळीतील उच्चभ्रू वस्तीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी या विकृत मनोवृत्तीच्या अत्याचारी काकाला अटक केली आहे.
या घटनेतील तरुणी अवघी २१ वर्षांची असून, ती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. वडिलांच्या निधनामुळे ती आणि तिचा हा काका असे दोघेजण घरात राहत होते. या तरुणीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, १५ मे रोजी काकाने तिला मारहाण केली. त्यानंतर तिचे विवस्त्र अवस्थेत फोटो, व्हिडीओ काढले. चाकूच्या धाकात तिच्याशी अनैसर्गिक अत्याचार केला. अंगावर पेटता कापूर टाकून पायाला हाताला भाजून जखमी केले. २३ फेब्रुवारीपासून आरोपीचे अत्याचार सुरू होते. अखेर, शनिवारी तरुणीने पोलिसांत धाव घेत अत्याचाराला वाचा फोडली. पोलिसांनीही तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.
Web Title: 52-year-old uncle abused young nephew
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App