Home संगमनेर संगमनेर: खासगी दूध संघाचा टँकर अन्न व औषध प्रशासनाने पकडला

संगमनेर: खासगी दूध संघाचा टँकर अन्न व औषध प्रशासनाने पकडला

Sangamner News: एका खासगी दूध संघाच्या दुधाचा टँकर नाशिकच्या अन्न (Food and Drug Administration seized) व औषध प्रशासनासह जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आणि अन्न चाचणी प्रयोगशाळेच्या संयुक्त पथकाने घोटी शिवारात पकडण्यात आला.

Food and Drug Administration seized the tanker of the private milk association

संगमनेर: नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उल्हास लोहोकरे यांनी मुंबईकडे जाणाऱ्या विविध चार दुधाच्या टँकरमधील 66, 763 लिटर दुधाची जागेवर तपासणी केली. यामध्ये संगमनेर शहरानजीक कसारा दुमाला येथील एका खासगी दूध संघाच्या दुधाचा टँकर नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनासह जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आणि अन्न चाचणी प्रयोगशाळेच्या संयुक्त पथकाने घोटी शिवारात पकडण्यात आला असून  तपासणी केली असता टँकरमधील दुधात भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्याने टँकर ताब्यात घेण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी सु. दे. महाजन, योगेश देशमुख, अमित रासकर, गोपाल कासार, एस. के. पाटील, मनीष सानप, उल्हास लोहकरे, योगेश नागरे, निवृत्ती साबळे, विजय पगारे व संजय नारागुडे कारवाई केली.

या कारवाईत कासारा दुमाला शिवारातील प्रवरा मिल्क प्रोसेसिंग या खासगी दूध डेअरीतून 3320 लिटर दूध घेवून निघालेला टँकर (क्र. एम. एच. 48 / ए. जी. 4692) सिन्नर-घोटी मार्गावर भाटवाडी शिवारात अडविण्यात आला असून त्यातील दुधाचे नमूने तपासले असता भेसळ असल्याची चाचणी सकारात्मक आली. यामुळे पथकाने टँकरमधून वेगवेगळे चार दुधाचे नमुने घेवून तपासणी केली असता भेसळयुक्त दुधाची जागेवर विल्हेवाट लावली.

नष्ट केलेल्या दुधाची किंमत 1.13 लाख रुपये आहे. दुधाचे नमुने अधिक तपासणीस पाठविले आहेत. अहवाल प्राप्त होताच खासगी दूध डेअरीवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये कारवाई होईल असे सांगण्यात आले.

Web Title: Food and Drug Administration seized the tanker of the private milk association

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here