अकोले: दहावीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती, अत्याचार करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल
Akole News: इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी चार महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजूर: अकोले तालुक्यातील साकीरवाडी भागातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी चार महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाजणाविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसन नामदेव भांगरे (राहणार साकीरवाडी, ता. अकोले) असे संशियीत आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर विद्यार्थिनी ही अकोले येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. चार एप्रिल 2023 रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने यावर उपचार करून गोळ्या औषधे घेतली मात्र काही फरक न पडल्याने सदरची घटना आई व चुलते यांना सांगितली. त्यांनी देखील उपचार केले परंतु काही फरक तर पडला नाही उलट वेदना वाढल्या यामुळे तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांच्या तपासणीत सदर विद्यार्थीनी चार महिन्याची गरोदर असल्याची बाब समोर आली.
या घटनेने या मुलीच्या आईला मोठा धक्का बसला. या घटनेने तिची आई ही चक्राऊन गेली मात्र आपल्या मुलीवर झालेला अन्याय तिला खरंतर सहन झाला नाही यामुळे याची पुढे शहानिशा केली असता एप्रिल 2023 मध्ये घरात घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन किसन नामदेव भांगरे (राहणार साकीरवाडी, ता. अकोले) याने लग्नाचे आमिष दाखवून सदर मुलीवर अत्याचार केला. एवढ्या वरच न थांबता या आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. खरंतर पोट दुखल्यामुळे ही बाब उघडकीस आली.
याबाबत पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरुन किसन भांगरे याच्याविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Web Title: Class 10 student pregnant, case filed against abuse
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App