Home क्राईम तरुणाने आधी श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला अन् उचलले टोकाचे पाऊल

तरुणाने आधी श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला अन् उचलले टोकाचे पाऊल

Beed: बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणाने श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

20-year-old youth commits suicide while keeping a tribute status

बीड:  बीड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणाने श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शुभम बाळासाहेब जगताप वय 20 असे त्या तरुणाचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, बीड  जिल्ह्यातील आत्महत्येचं ग्रहण सुटायचे नाव घेत नाही. अशीच एक धक्कादायक घटना बीडच्या अंधापुरीघाट गावातून समोर आली आहे. अंधापुरीघाट गावात एका 20 वर्षीय तरुणाने स्वतःच्या मोबाईलवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती कळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सदरील घटनेचा पंचनामा नेकनूर पोलिसांनी केला असून शुभम जगताप याने नेमकी आत्महत्या का केली?  हे अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 20-year-old youth commits suicide while keeping a tribute status

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here