Home अकोले आ. डॉ. किरण लहामटे यांची पुन्हा पलटी, फोन बंद केला, मात्र अखेर...

आ. डॉ. किरण लहामटे यांची पुन्हा पलटी, फोन बंद केला, मात्र अखेर गाठलेच

Kiran Lahamate:  आ. डॉ. किरण लहामटे यांनी पुन्हा पलटी मारली असून ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात गेले.

come to Dr. Kiran Lahamte turned again, switched off the phone, but finally reached Ajit Pawar

 

अकोले: आ. डॉ. किरण लहामटे यांनी पुन्हा पलटी मारली असून ते अजित पवार यांच्या गटात गेले असल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवर त्यांनी सह्याही केल्या. आपल्या गोटातून निसटलेल्या डॉ. लहामटे यांना परत आणण्यासाठी अजित पवार यांनी नगर जिल्ह्यातील आपल्या खास विश्वासू सहकाऱ्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यांचे सहकारी नगरचे बाळासाहेब जगताप यांनी तीन दिवस अकोल्यात तळ ठोकून कामगिरी पार पाडली आहे.  

अजित पवार यांच्या शपथविधीच्यावेळी डॉ. लहामटे त्यांच्यासोब होते. त्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांवर त्यांनी सह्याही केल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी लहामटे ज्येष्ठ नेते पवार यांच्याकडे परतले. मुंबईतील सभेला त्यांनी उपस्थितीही लावली. आपल्याकडून फसवून सह्या करून घेतल्याचे ते सांगत होते. तर कोपरगावचे काळे परदेशात असल्याने त्यांची भूमिका स्पष्ट होत नव्हती. तेव्हापासून लहामटे यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.

अजित पवार यांनी ही जबाबदारी नगरचे विळद येथील त्यांचे विश्वासू कार्यकर्ते बाळासाहेब जगताप यांच्यावर सोपविली. जगताप यांनी तडक अकोले गाठले. डॉ. लहामटे यांची समजूत काढली. मात्र, ते सहजासहजी तयार होत नव्हते. त्यामुळे जगताप अकोल्यातच तळ ठोकून थांबले. त्यांनी विविध माध्यमांतून लहामटे यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र लहामटे त्यांना टाळत होते. एवढेच काय, त्यांची भेट आणि संवादही टाळत होते. घरी न थांबता अज्ञात ठिकाणी थांबू लागले. अखेर शनिवारी रात्री जगताप यांनी डॉ. लहामटे यांना गाठलेच. त्यांना अजित पवार यांचा निरोप देण्यात आला. त्यांना रात्रीच मुंबईला नेण्यात आले. तेथे मध्यरात्रीच्या सुमारात त्यांची अजित पवार यांच्याशी भेट घडवून आणण्यात आली. अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. अकोल्यात काय विकास कामे करायची, याचा आराखडा तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे आणखी काही कागदपत्रे तयार करण्यात येत असून त्यावरही डॉ. लहामटे यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता लहामटे कायदेशीररित्याही अजित पवार यांच्यासोबत बांधले गेले असल्याचे सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे सध्या कुटुंबासह अमेरिकेत आहेत. त्यांच्याकडूनही अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र करून घेतल्याचे सांगण्यात येते. एक दोन दिवसांत ते परत येणार आहेत. त्यावेळी ते अजित पवार यांच्यासोबत असल्याची भूमिका स्पष्ट करतील, असेही सांगण्यात आले. त्यामुळे आता नगर जिल्ह्यातील रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे हे दोघे वगळता राष्ट्रवादीचे चार आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. नगरचे माजी आमदार अरुण जगताप, चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आजपर्यंत अजित पवार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.

Web Title: come to Dr. Kiran Lahamte turned again, switched off the phone, but finally reached Ajit Pawar

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here