धक्कादायक! ‘मला तू आवडतेस’ तरुणाचे विवाहितेला सतत फोन; नंतर केला भयानक कृत्य
Beed crime: घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याची घटना.
बीड: बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तरुणानं अगोदर सतत फोन करून २० वर्षीय विवाहितेचा संसार मोडला. त्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महेश अजिनाथ राख असं या संशियीत तरुणांच नाव आहे. पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, . महेश अजिनाथ राख हा तरुण सतत फोन करून या विवाहितेला त्रास द्यायचा. या तरुणामुळे तिचा संसार मोडला. त्यानंतर तिच्या पतीनं तिला माहेरी आणून सोडलं. संबंधीत पीडित तरुणी तिच्या माहेरी राहत होती. तिच्या माहेरच्या घरी घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं या विवाहितेचं तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या वतीनं बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी महेश राख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Web Title: Taking Advantage of the fact that there was no one in the House Rape
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App