Home क्राईम …म्हणून 28 वर्षीय मुलाचा बापानेच गळा आवळुन केला खुन

…म्हणून 28 वर्षीय मुलाचा बापानेच गळा आवळुन केला खुन

Pune Crime:  औषधांचा खर्च परवडत नसल्याने बापानेच स्वतःच्या 28 वर्षीय मुलाचा गळा आवळुन खुन (Murder) केल्याची धक्कादायक घटना.

28-year-old boy was murder by his father

पुणे: मुलाच्या आजारपणाला कंटाळुन व त्याच्या औषधांचा खर्च परवडत नसल्याने बापानेच स्वतःच्या 28 वर्षीय मुलाचा गळा आवळुन खुन  केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या हडपसर परिसरातील काळेपडळ  येथील केतकेश्वर कॉलनीमध्ये गुरूवारी घडली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बापाला ताब्यात घेवून त्यास हडपसर पोलिस ठाण्याच्या  ताब्यात दिले आहे.

अभिजीत बाबुराव जायभाय (28) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा बाप बाबुराव दिनकर जायभाय (50) याला अटक केली आहे. यासंदर्भात सुनिता बाबुराव जायभाय (45) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी बाबुराव जायभाय यांचा मुलगा अभिजीत याला 6 महिन्यांपुर्वी डोक्याला मार लागला होता. त्याला काहीच काम करता येत नसल्यामुळे तो घरीच बेडवर झोपुन होता. घरीच अंथरूणावर खिळून असल्याने त्याची विष्टा काढणे, साफसफाई करणे ही कामे घरच्यांनाच करावी लागत होती.

अभिजीतच्या आजारपणाला कंटाळुन व त्याच्या औषधांचा खर्च परवत नसल्याने वडिल बाबुराव जायभाय यांनी यापुर्वीही त्याला मारहाण करून मारण्याचा प्रयत्न केला होता. अखेर गुरूवारी बाबुराव यांनी अभिजीतचा गळा आवळुन खून केला. घटनेची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थी धाव घेतली. गुन्हे शाखेच्या युनिट-5 चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांनी बाबुराव जायभाय यांच्याकडे चौकशी केली असता त्यानेच खुन केल्याचे निष्पन्न झाले. त्याला हडपसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाबुराव जायभाय हे हमाली काम करतात. याप्रकरणी अधिक  तपास पोलिस निरीक्षक विश्वास डगळे  करीत आहेत.

Web Title: 28-year-old boy was murder by his father

See Latest Marathi NewsAhmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here