Home संगमनेर संगमनेर तालुक्यात आणखी एक अवैध घटना उघडकीस, वन विभागाची सापळा रचत कारवाई

संगमनेर तालुक्यात आणखी एक अवैध घटना उघडकीस, वन विभागाची सापळा रचत कारवाई

Sangamner News: अवैध लाकूड वाहतूक करणार्‍या 3 पिकअप व एक ट्रक अशा 4 वाहनांवर कारवाई करीत साहित्य जप्त (Seized).

3 pickups and one truck transporting illegal timber and materials were seized

संगमनेर: संगमनेर तालुक्यात सातत्याने अवैध घटना समोर येत असताना आता आणखी एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. संगमनेर भाग 2 वनपरिक्षेत्रांतर्गत असणार्‍या संगमनेर तालुक्यातील निमोण येथे वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी कारवाई करीत अवैध लाकूड वाहतूक करणार्‍या 3 पिकअप व एक ट्रक अशा 4 वाहनांवर कारवाई करीत साहित्य जप्त केले. ही शनिवारी (दि. 17) कारवाई करण्यात आली. सदर कारवाई 52 घनमीटर निम व इतर प्रजातीचे लाकूड हस्तगत करण्यात आले. दोन वखारीमधून हे लाकूड भरण्यात येत होते.

संगमनेर भाग 2 वनपरिक्षेत्रांतर्गत असणार्‍या निमोण शिवारातील नांदूरशिंगोटे-लोणी राज्यमार्गालगत सिटीजन वेब्रिज नजिक अवैधरित्या लाकूड वाहतूक, साठवणूक व कटाई चालू असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्या नेतृत्वाखाली वनपाल व्ही. डी. जाधव, एस. बी. ढवळे, वनरक्षक श्रीमती आर. एम. दिघे, एस. एम. पारधी, डी. आर. कडनर, व्ही. आय. जारवाल यांच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली.

सदर कारवाई दरम्यान 52 घनमीटर निम व इतर प्रजातीचा लाकूड असा मुद्देमाल मिळून आला. सदर मालाची अवैध वाहतूक 3 पिकअप व एका ट्रकद्वारे करण्यात येत असल्याचे उघड झाले. हे लाकूड माल दोन वखारीमधून भरण्यात येत असल्याचे दिसून आले. प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 नुसार कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यातील लाकडासाहित वाहने व इतर सामान जप्त करण्यात आले.

अधिक चौकशी वनपाल व्ही. डी. जाधव करीत आहेत. अशा प्रकारची लाकडाची अवैध वाहतूक, साठवणूक वा कटाई करताना कुणीही आढळल्यास, वनविभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा संगमनेर भाग 2 वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी दिला आहे.

Web Title: 3 pickups and one truck transporting illegal timber and materials were seized

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here