अकोले शहरातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली
Akole Theft: कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील नामांकित तीन दुकानांमध्ये चोरी, पोलीस पेट्रोलिंग सुरू असताना देखील चोरी होते कशी? डीवायएसपी वाघचौरे व पोलीस निरीक्षक भोये यांनी घेतली प्रकरणाची दखल, भिगांरे कराळे बिकानेर स्वीट्स दुकाने शटर उचकटून चोरी.
अकोले: अकोले शहरात काल रात्री 2.30 सुमारास अज्ञात दरोडेखोराकडून कोल्हार घोटी राज्य महामार्ग लगत असणारे अकोले शहरातील कराळे बंधू भिंगारे बंधू बिकानेर स्वीट्स या तीन दुकानांचे स्वेटर तोडून या दुकानातील रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश आले आहे रात्रीच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग सुरू असताना देखील भर वस्तीमध्ये या ठिकाणी हात साफ केला आहे.
अकोले बस स्थानक परिसरामध्ये असणारे बिकानेर स्वीट्स या दुकानातील 80 हजार रुपये व मारुती जिजाबा भिंगारे यांच्या दुकानातून 25000 व दत्ता कराळे यांच्या दुकानातून पंचावन्न हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून चोरीचे सत्र बंद होते मात्र पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. चोरट्याने आपला मोर्चा अकोले शहराकडे वळविला असून भरवस्तीमध्येच शटर तोडून चोरी केल्याने आता ग्रामस्थांमध्ये वातावरण तयार झाले आहे संगमनेर जिल्हा पोलीस उपाध्यक्ष सोमनाथ वाघचौरे व अकोल्याचे पोलीस निरीक्षक भोये यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असून आरोपींनी ज्या ठिकाणी चोरी केली आहे ते सर्व सीसीटीव्ही फुटेज कव्हरेज सर कंपनीची मोटरसायकल व दोन इसम दिसून येतात मात्र दोन्ही इसमांच्या तोंडाला रुमाल बांधल्यामुळे ते ओळख परेडमध्ये समजू शकले नाही… दिसून येत आहे त्यामुळे चोरांना पकडण्यात पोलीस यंत्रणा नक्कीच यश मिळेल अशी खात्री पोलीस यंत्रणा कडून देण्यात येत असली तरी भर वस्तीमध्ये ही चोरी झाल्याने आता मात्र महिला वर्गामध्ये व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Theft broke into three shops in Akole City
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App