Home पुणे दीड लाखाची लाच स्वीकारताना पोलिस निरीक्षक सह तिघे जाळ्यात

दीड लाखाची लाच स्वीकारताना पोलिस निरीक्षक सह तिघे जाळ्यात

Pimpari: खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडून दीड लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक, एक पोलिस कर्मचारी व एका खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडल्याची कारवाई.

Police inspector and three in the net while accepting a bribe of one and a half lakh

पिंपरी : खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक, एक पोलिस कर्मचारी व एका खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सेक्टर क्रमांक २७, प्राधिकरण निगडी येथे शनिवारी (दि. १७) ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात (Arrested) घेण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, पोलिस कर्मचारी सागर तुकाराम शेळके, खासगी इसम सुदेश शिवाजी नवले (वय ४३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ‘एसीबी’ चे पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४८ वर्षीय महिलेने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला हातउसणे व बँकेमधून कर्ज काढून पैसे दिले होते. मात्र, बँकेच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने तक्रारदार महिलेने उसणे दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने तक्रारदार ४८ वर्षीय महिलेच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीकामी सहायक पोलिस निरीक्षक अमोल कोरडे याच्याकडे होता. तक्रारदार महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक निरीक्षक कोरडे, पोलिस कर्मचारी सागर शेळके व खासगी इसम नवले यांनी तक्रारदार महिलेकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी कली. याबाबत तक्रारदार ४८ वर्षीय महिलेने ‘एसीबी’ कडे तक्रार केली. त्यानुसार ‘एसीबी’ने महिलेच्या तक्रारीची पडताळणी केली. सहायक निरीक्षक कोरडे व पोलिस कर्मचारी शेळके यांच्यावतीने खासगी इसम नवले याने दीड लाख रुपयांची लाच मागणी केली व नवले याने केलेल्या लाच मागणीस सहायक निरीक्षक कोरडे व पोलिस कर्मचारी शेळके यांनी दुजोरा देऊनन सहाय्य केल्याचे समोर आले. त्यानुसार ‘एसीबी’ने शनिवारी सापळा रचला. त्यावेळी लाचेची दीड लाखांची रक्कम नवले याने स्वीकारली. त्यानंतर ‘एसीबी’ ने तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: Police inspector and three in the net while accepting a bribe of one and a half lakh

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here