Home क्राईम संगमनेर: जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाखांचे पाइप चोरीला

संगमनेर: जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाखांचे पाइप चोरीला

Sangamner Theft: पाण्याच्या टाकीच्या कम्पाउंडमध्ये ठेवलेले जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाख ०५ हजार ५२३ रुपये किमतीचे पाइप चोरीला.

43 lakh pipe of Jaljeevan Mission Yojana was theft 

संगमनेर: पाण्याच्या टाकीच्या कम्पाउंडमध्ये ठेवलेले जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाख ०५ हजार ५२३ रुपये किमतीचे पाइप चोरीला गेल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या तिगाव शिवारात ही घटना घडली आहे. सोमवारी (दि.०७) सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अभियंता सचिन शरद रेवगडे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की,   तिगाव परिसरात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू असल्याने पाण्याच्या टाकीचे कम्पाउंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ५२८ पाइप ठेवलेले होते. २८ जुलै सकाळी १०.३० ते ७ ऑगस्ट सकाळी ६ वाजेच्या दरम्यान हे पाइप चोरीला गेल्याचे रेवगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्यातील परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी यासंदर्भाने माहिती घेत तपासाच्या सूचना दिल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शालोमन सातपुते अधिक तपास करीत आहे. जलजीवन मिशन योजनेचे पाइप चोरीला जाण्याची या महिन्यातील  दुसरी घटना आहे.

या अगोदर देखील संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे ३० लाख ३ हजार ७८४ रुपये किमतीचे पाइप चोरीला गेल्याची घटना घडली होती. 

Web Title: 43 lakh pipe of Jaljeevan Mission Yojana was theft 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here