Home क्राईम अभियंता तरुणीवर पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार

अभियंता तरुणीवर पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार

Pune Crime:  हॉटेलमध्ये तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार (raped) केल्याची घटना.

young engineer was raped at gunpoint

पुणे: विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून संगणक अभियंता तरुणीवर पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकरणी एका तरुणावर  चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल चंद्रकांत यादव (वय ३२, रा. साेना अपार्टमेंट, ओैंध रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. यादवविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा शस्त्र बाळगणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. ती अविवाहित आहे. तरुणीने विवाहाविषयक माहिती एका संकेतस्थळावर दिली होती. त्यानंतर तरुणी आणि आरोपी यादव याची विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली. यादव हा तरुणीला बालेवाडी‌ भागात भेटला. त्याने तरुणीकडे विवाहाबाबत विचारणा केली. त्यानंतर २४ जून रोजी यादव तरुणीला भेटला. तिला विवाहाचे आमिष दाखविले. बाणेरमधील एका हाॅटेलमध्ये तरुणीला यादव घेऊन गेला. हाॅटेलमधील खोलीत त्याने तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखविला. त्याने तरुणीवर बलात्कार केला. यादवने तरुणीची माफी मागितली. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे त्याने सांगितले.

महिनाभरानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउ‌डवीची उत्तरे दिली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी यादवने तरुणीला दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे करीत आहे.

Web Title: young engineer was raped at gunpoint

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here