Home महाराष्ट्र देवदर्शनाला जाताना कार झाडावर आदळून अपघातात चौघांचा मृत्यू, ५ जखमी

देवदर्शनाला जाताना कार झाडावर आदळून अपघातात चौघांचा मृत्यू, ५ जखमी

Satara Accident:  देवदर्शनाला जाताना कार झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना.

Four died in an accident when a car hit a tree on their way to Devdarshan

सातारा: सातारा जिल्ह्याच्या सुर्याचीवाडीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनाला जाताना गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

साताऱ्यात देवदर्शनाला जाताना कार झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुर्याचीवाडी भागात हा भीषण अपघात झाला. खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या कारमधून कुरोली आणि बनपुरी येथील काही भाविक लोकरेवाडी येथे श्री संत बाळूमामांच्या दर्शनाला जात होते. दरम्यान खटाव ते मायणी सुर्याचीवाडी दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात 5 जण जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनास्थळी लोकांची गर्दी झाली असून परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व अपघातग्रस्तांचे नातेवाईक यांच्या सहकार्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Four died in an accident when a car hit a tree on their way to Devdarshan

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here