धक्कादायक! भाचीचे ४५ दिवस लैंगिक शोषण, मामाला अटक
२३ वर्षीय अविवाहित भाचीवर तिच्या सख्ख्या मामानेच सतत ४५ दिवस लैंगिक अत्याचार (Sexual abused).
जळगाव जामोद |बुलढाणा: २३ वर्षीय अविवाहित भाचीवर तिच्या सख्ख्या मामानेच सतत ४५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मध्य प्रदेशातील एका गावात नेऊन पीडितेला घरात डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपी मामाला न्यायालयीन कोठडीत आहे. नराधम मामाने मोबाइलमधील एका मुलाचा फोटो दाखवून त्याच्यासोबत लग्न लावून देतो, असे सांगून पिडीतेला मळ्यात घेऊन गेला. त्यानंतर बसने मध्य प्रदेशला गेला. तेथे डांबून ठेवत अत्याचार केल्याचे तपासातून पुढे आले आहे.
Web Title: 45 days of sexual abuse of niece, uncle arrested
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App