Home अहमदनगर अहमदनगर: राष्ट्रवादी उपाध्यक्षाला ५० हजारांचा गंडा

अहमदनगर: राष्ट्रवादी उपाध्यक्षाला ५० हजारांचा गंडा

Breaking News | Ahmednagar: हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून ५० हजार रुपयांना गंडा (Fraud).

50 thousand Fraud to the NCP vice president

राहुरी : दोन- तीन भामट्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उपाध्यक्ष संदीप दुशिंग यांना हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून ५० हजार रुपयांना गंडा घातला.

हा प्रकार दि. ८ रोजी उघडकीस आला. दुशिंग दुपारी १२.३० वाजता राहुरीत बस स्थानकासमोरील एका एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले होते. यावेळी त्यांच्या मागे तीन अनोळखी तरूण येऊन उभा राहिले. दुशिंग यांनी एटीएममधून २० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता, ‘पैसे निघाले नाही, १० हजार रुपये काढा.’ असे शेजारच्या एका तरुणाने दुशिंग यांना सांगितले. दुशिंग यांनी पैसे काढले. नंतर भामट्यांनी बहाणा करीत, हात चलाखीने दुशिंग यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली.

काही वेळाने दुशिंग यांच्या एटीएम कार्डवरून देवळाली प्रवरा येथील एटीएममधून तीनदा प्रत्येकी ९५०० हजार रुपये व नंतर १५०० रुपये असे ३०-३५ हजार रुपयांची रोकड काढली. दुपारी ४ वा. दुशिंग यांच्या एटीएम कार्डवरुन

भामट्यांनी काही खरेदी केली. दुशिंग यांच्या एटीएम कार्डवरुन एकूण ४६, १२३ रुपये काढले. एटीएममधून रक्कम काढल्याचे मेसेज दुशिंग यांच्या मोबाईलवर आल्याने त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पो. नि. संजय ठेंगे यांना या घटनेची माहिती दिली.

Web Title: 50 thousand Fraud to the NCP vice president

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here