Home अकोला धक्कादायक! अकोल्यात शाळेच्या छतावर आढळलं नवजात अर्भक

धक्कादायक! अकोल्यात शाळेच्या छतावर आढळलं नवजात अर्भक

Breaking News | Akola Crime:  जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेत नवजात अर्भक आढळून (New born Baby) आल्यानं खळबळ उडाली.

newborn baby was found on the roof of a school in Akola

अकोला : अकोला शहरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेत आज सकाळी नवजात अर्भक आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास अकोला शहरातील रतनलाल प्लांट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या मैदानात मुलं क्रिकेट खेळ असताना त्यांचा चेंडू शाळेच्या टेरेसवर गेला. चेंडू काढण्यासाठी छतावर गेलेल्या मुलांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक आढळून आलं

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. हे अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उर्दू माध्यमिक शालेयच्या शाळेच्या टेरेसवर हे अर्भकं आढळून आल्याने खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अंदाजे चार ते पाच महिन्यांची हे अर्भक असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्भक कोठून आले, ते कुणी टाकले यासाठी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फूटेज देखील तपासण्यात येणार आहे.

Web Title: newborn baby was found on the roof of a school in Akola

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here