Home औरंगाबाद ऑनलाईन गेममध्ये ५० हजार गमावले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाची आत्महत्या

ऑनलाईन गेममध्ये ५० हजार गमावले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाची आत्महत्या

Chhatrapati Sambhaji Nagar :  ऑनलाईन गेममध्ये पैसे गमवल्याने चिंतेत असलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली.

50,000 lost in online games, engineering student commits suicide

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेममध्ये पैसे गमवल्याने चिंतेत असलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हर्सल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौरव चंद्रकांत पवार (वय 23 वर्षे, रा. पवननगर, टीव्ही सेंटर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की,  गौरव पवारला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय जडली होती. त्यात त्याने जवळपास 50 हजार रुपये गमावल्याची नातेवाईकांमध्ये चर्चा होती. हा प्रकार समजल्यावर गमावलेले पैसे भरण्यासाठी गौरवला त्याच्या मामाने त्याला 40  हजार रुपये दिले होते. मात्र तरीही तो नेहमी तणावातच होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी घरी वडिलांसोबत त्याने जेवण केले. आई-वडील कामानिमित्त बीडला गेले. तर घरात एकटाच असल्यामुळे गौरव दुपारच्या वेळी हर्सूल तलाव परिसरात आला. बऱ्याच वेळ तो तलावाच्या काठावर बसून होता. मात्र काही वेळाने त्याने तलावात उडी घेतली.

तरुणाने हर्सूल तलावात उडी घेतल्याची बाब तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षक राजेश गवळे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ याची माहिती हर्सल पोलिसांसह अग्निशमन विभागाला कळवली. त्यानुसार अग्रिशमन विभागाचे अधिकारी आर. के. सुरे, अब्दुल अजीज, संजय कुलकर्णी, हरिभाऊ घुगे, जवान सोमिनाथ भोसले, अशोक वेलदोडे, शुभम कल्याणकर, संदीप मुगशे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत गौरवला तलावातून बाहेर काढले. त्याला घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

Web Title: 50,000 lost in online games, engineering student commits suicide

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here