Home महाराष्ट्र ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीकडून शेजारणीवर २६ वर्ष बलात्कार, आता म्हणतो तुझ्यात रस...

६५ वर्षीय वृध्द व्यक्तीकडून शेजारणीवर २६ वर्ष बलात्कार, आता म्हणतो तुझ्यात रस नाही सुनेला पाठव

Mumbai Raped Case: महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार, आता तुझ्या मुलाच्या बायकोला माझ्याकडे पाठव अशी धमकी, पोलीस ठाण्यात धाव.

65-year-old man raped a neighbor for 26 years

मुंबई: एका ६५ वर्षीय सावकाराने शेजारी राहणाऱ्या महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सावकार तब्बल २६ वर्ष पिडीतेवर अत्याचार करीत होता. पिडीत महिला ही ५१ वर्षाची आहे. त्याने या महिलेवर अनेकदा बलात्कार केला. पैसे देखील काढले. त्यानंतर आता तुझ्या मुलाच्या बायकोला माझ्याकडे पाठव अशी धमकी दिली. त्यानंतर पिडीतेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आरोपीनं २६ वर्षांपूर्वी महिलेवर पहिल्यांदा बलात्कार (Raped) केला. तुझे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ (Porn Video) तुझ्या मुलांना दाखवेन अशी धमकी देत आरोपी सातत्यानं महिलेवर अत्याचार करत राहिला. एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीला अटक केली. आरोपी सध्या पुण्यात वास्तव्यास होता. बलात्कार, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पीडित महिला मुंबई सेंट्रल येथील चाळीत वास्तव्याला होती. १९९६-९७ च्या दरम्यान ती घरात एकटी असताना आरोपी तिच्या घरात आला. तो तिच्या पतीचा चांगला मित्र होता. आरोपीनं महिलेवर बलात्कार केला. आरोपी श्रीमंत आणि प्रभावशाली असल्यानं महिलेनं त्यावेळी तक्रार दाखल केली नाही. मात्र तिनं ही बाब बहिणीच्या कानावर घातली. बहिणीनं पीडितेला घर बदलण्याचा सल्ला दिला. यानंतर महिला तिच्या कुटुंबासह ठाण्याला राहायला गेली. २००२ मध्ये तिच्या पतीचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला.

२०११ मध्ये कांदिवलीतील बाजारात आरोपीनं पीडितेला पाहिलं. त्यानं तिला पत्ता आणि मोबाईल नंबर देण्यास सांगितलं. मात्र पीडितेनं नकार दिला. त्यावर आरोपीनं बलात्काराबद्दल तुझ्या मुलांना सांगेन, अशी धमकी दिली. असहाय पीडितेला तिचा मोबाईल नंबर आणि पत्ता द्यावा लागला. यानंतर पुन्हा अत्याचार सुरू झाले. आरोपी पीडितेला डोंबिवली, ठाणे आणि वसईतील लॉजवर अनेकदा बोलवू लागला. तिच्यावर अत्याचार करू लागला. महिलेवर विरोध करताच तुझे फोटो कुटुंबाला पाठवेन अशी धमकी दिली.

अत्याचार करणाऱ्या आरोपीनं नंतर पीडितेकडे पैशांची मागणी केली. गेल्या ४-५ वर्षांत आरोपीनं पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून ५-६ लाख रुपये उकळले. या त्रासाला कंटाळून पीडितेनं कांदिवलीतील घर सोडलं आणि ती वरळीतील चाळीत राहायला गेली.

फेब्रुवारी २०२१ मध्ये आरोपीनं पीडितेला फोन केला. माझ्या मुलाचं लग्न आहे. त्यासाठी मला २.५ लाख रुपये हवेत, अशी मागणी आरोपीनं केली. महिलेनं पैसे देण्यास नकार दिला. आरोपीनं पुन्हा तिला ब्लॅकमेल केलं. त्यामुळे पीडितेनं तिचे दागिने विकून आरोपीला पैसे दिले.

या वर्षी जूनमध्ये आरोपीनं पीडितेला फोन करून दादर रेल्वे स्थानकात भेटायला बोलावलं. आता तू म्हातारी झाली आहेस. मला तुझ्यात रस नाही. तुझ्याऐवजी सुनेला पाठव, असं आरोपीनं म्हटलं. यानंतर महिलेने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला अन पोलीस ठाणे गाठले.

Web Title: 65-year-old man raped a neighbor for 26 years

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here