Home संगमनेर संगमनेर: इलेक्ट्रिक कंपनीच्या व्यवस्थापक व लिपिकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

संगमनेर: इलेक्ट्रिक कंपनीच्या व्यवस्थापक व लिपिकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

Sangamner Bribe Case: वेतन बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी पंचासमक्ष 3 हजार रुपयांची मागणी. 

manager and clerk of the electric company were caught red-handed while accepting bribe

संगमनेर: पगाराची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच (Bribe) घेतना प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीच्या व्यवस्थापक व लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे. पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलिस हवालदार हरुन शेख यांनी ही कारवाई केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, घुलेवाडी येथे राहणारा वीज वितरण कंपनीचा बाह्यश्रोत कर्मचारी हा संगमनेर येथील प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीकडे नेमणुकीस आहे. त्यांना सदर कंपनी कडून उप अभियंता, म.रा.वि.वितरण कंपनी कडून बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून सप्टेंबर 2018 पासून नेमण्यात आलेले आहे. प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी ही शासनाकडे नोंदणीकृत कंपनी आहे. या कर्मचार्यांचे वीज वितरण कंपनीकडून प्रत्येक महिन्याचे वेतन प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीकडे वर्ग केले जाते.

प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी मधील व्यवस्थापक व लिपिक हे संबंधित कर्मचार्यांचे जून महिन्याचे वेतन त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करणेसाठी 3 हजार रुपयांची लाचेची मागणी करत होते. यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचार्याने अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तक्रारीचे अनुषंगाने आज लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने लाच मागणी पडताळणी केली. असता जून महिन्याचे वेतन बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी पंचासमक्ष 3 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनी कार्यालयात लाचेचा सापळा लावण्यात आला. या पथकाने लाचेची रक्कम स्विकारली असता प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीचे व्यवस्थापक सुनिल पोपट पर्बत, व लिपिक सुजाता तेजेश कांबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Web Title: manager and clerk of the electric company were caught red-handed while accepting bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here