Home नाशिक Accident | ट्रॅक्टर आणि कारच्या भीषण अपघातात, ७ जण जागीच ठार, १६...

Accident | ट्रॅक्टर आणि कारच्या भीषण अपघातात, ७ जण जागीच ठार, १६ जण जखमी

7 killed on tractor and car accident

नाशिक | Nashik: नाशिक जिल्ह्यातील वणी जवळ ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू तर १६ जण जखमी झाले आहेत. वणीजवळ दोन ट्रॉलीमध्ये मजुरांना घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच ठार झाले तर १६ जण जखमी झाले आहेत. कारवर टॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यामुळे कार ट्रॉलीखाली चिरडली. ट्रॉली मजूरांना घेऊन जात होती.

या अपघातात जखमी झालेले सर्वजण जळगाव जिल्ह्यातील आहेत. यातील १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरेखा अशोक शिंदे, लक्ष्मण अशोक शिंदे, संगीता पोपट पवार, आकाश पोपट पवार, तनु दीपक गायकवाड, अनुष्का दीपक गायकवाड, मनीषा दीपक गायकवाड, गणेश बापू पवार, विशाल बापू पवार, गणेश बापू पवार, प्रिया संजय म्हस्के, अजय नवल बोरसे, अशी जखमींची नावे आहेत. जखमी झालेले सर्व जळगाव जिल्ह्यातील आहेत.

या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात ३ महिला, २ पुरुष व एका लहान मुलीचा समावेश आहे, यातील ६ पैकी तीन मृतांची ओळख पटली आहे. सरला बापू पवार (वय ४५), बिबाबाई रमेश गायकवाड(वय ४०), वैशाली बापू पवार( वय ४) हे सर्व राहणार जळगाव जिल्ह्यातील उंदिरखेदा येथील आहेत.

Web Title: 7 killed on tractor and car accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here