Home संगमनेर संगमनेर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले, जिल्हा परिषद गट व...

संगमनेर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले, जिल्हा परिषद गट व गण वाचा

Sangamner Taluka Zilla Parishad Group and Gana

Sangamner | संगमनेर:  अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. संगमनेर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे. प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत. संगमनेर तालुक्यात आता 10 जिल्हा परिषद गट व 20 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे-

1) समनापूर गट- (समनापूर गण)- समनापूर, सुकेवाडी, कुरण, पोखरी हवेली, खांजापूर, मालदाड.

(निमोण गण)- पारेगाव बु., पळसखेडे, पिंपळे, कर्‍हे, सोनेवाडी, पारेगाव खुर्द, सोनोशी, निमोण, नान्नज दुमाला,

2) तळेगाव गट (तळेगाव गण)- तळेगाव (आरामपूर, अजमपूर, जुनेगाव, हसनाबाद, शिवापूर), चिंचोली गुरव, कासारे, लोहारे, देवकौठे, वडझरी बुद्रुक, काकडवाडी, वडझरी खुर्द, तिगाव.

 (कोकणगाव गण)- कोकणगाव, मनोली, कौठे कमळेश्वर, निळवंडे, कोंची, करुले, मिरपूर, मेंढवण.

3) आश्वी बु. गट (आश्वी बु. गण)- आश्वी बु., निमगाव जाळी, चिंचपूर बु. (चिंचपूर खुर्द), उंबरी (बाळापूर), सादतपूर, औरंगपूर.

(आश्वी खुर्द गण)- आश्वी खुर्द, पिंप्री लौकी अजमपूर, खळी, दाढ खुर्द, चणेगाव, झरेकाठी, प्रतापपूर.

4) जोर्वे गट (जोर्वे गण)- जोर्वे, पिंपरणे, कनोली, रहिमपूर, जाखुरी, खराडी, ओझर खुर्द, कनकापूर.

 (अंभोरे गण)- पानोडी, शिबलापूर, कोळवाडे, शेडगाव, मालुंजे, ओझर बु., हंगेवाडी, अंभोरे.

5) संगमनेर खुर्द गट (संगमनेर खुर्द गण)- संगमनेर खुर्द (वैदुवाडी), निमज, हिवरगाव पावसा, खांडगाव, झोळे.

(वडगाव पान गण)- वडगाव पान, कोल्हेवाडी, रायतेवाडी, देवगाव, रायते, वाघापूर, माळेगाव हवेली, निंभाळे, निमगाव टेंभी, शिरापूर.

6) घुलेवाडी गट (घुलेवाडी गण)- घुलेवाडी.

(गुंजाळवाडी गण)- गुंजाळवाडी (ढोलेवाडी), वेल्हाळे, सायखिंडी.

7) धांदरफळ बु. गट (धांदरफळ बु. गण)- धांदरफळ बु., वडगाव लांडगा, चिखली, पिंपळगाव कोंझिरा, मंगळापूर, कौठे धांदरफळ, सांगवी.

(राजापूर गण)- राजापूर, जवळे कडलग, कासारा दुमाला, चिकणी, निमगाव भोजापूर.

8) चंदनापुरी गट (चंदनापुरी गण)- चंदनापुरी (गाभणवाडी), पिंपळगाव देपा (खंडेरायवाडी, मोधळवाडी), सावरगाव तळ, डोळासणे (बांबळेवाडी), पोखरी बाळेश्वर, कर्जुले खुर्द (गुंजाळवाडी पठार), पिंपळगाव माथा, शिरसगाव (धुपे).

(पेमगिरी गण)- पेमगिरी, मिर्झापूर, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, नांदुरी दुमाला, धांदरफळ खुर्द (गोडसेवाडी), सावरचोळ (मेंगाळवाडी),

9) साकुर गट (साकुर गण)- साकुर, जांभूळवाडी, नांदुर खंदरमाळ, जांबुत बु. (जांबुत खुर्द), हिवगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी.

(वरवंडी गण)- शिंदोडी, खरशिंदे (कणसेवाडी), रणखांबवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी, वरवंडी (कुंभारवाडी, चौधरवाडी), मांडवे बु., खांबे, डिग्रस.

10) बोटा गट (बोटा गण)- बोटा (मावळवाडी, केळेवाडी), अकलापूर (आभाळवाडी, शेळकेवाडी, येलखोपवाडी), घारगाव, आंबी दुमाला, भोजदरी (पेमरेवाडी), कुरकुटवाडी, म्हसवंडी, कुरकुंडी.

(खंदरमाळवाडी गण)- जवळे बाळेश्वर (कौठेवाडी), सावरगाव घुले, वनकुटे, कौठे खुर्द (खांडगेदरा), वरुडी पठार, खंदरमाळवाडी, आंबी खालसा, कौठे बु., सारोळे पठार, माळेगाव पठार, बोरबनवाडी, महालवाडी

Web Title: Sangamner Taluka Zilla Parishad Group and Gana

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here