Home अकोले सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात ७५ वा. प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात संपन्न

सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात ७५ वा. प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात संपन्न

Breaking News | Rajur:  सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात ७५ वा. प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात  संपन्न. (Republic Day)

75th in Sarvodaya Vidya Mandir Rajur Vidyalaya Republic Day was celebrated 

राजूर:  गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात ७५ वा. प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात  संपन्न झाला.  सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष मा. विवेकजी मदनसाहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन. कानवडे, संचालक विजय पवार,  व्ही.टी. पाबळकर, गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर, विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, लहानू परबत, व्यवस्थापक  प्रकाश  महाले , सुनील पाबळकर सर , रमाकांत डेरे,  रजनी टिभे, भारती महाले तसेच प्राचार्य बी.के. बनकर, उपप्राचार्य अण्णासाहेब  धतुरे सर , पर्यवेक्षक एस.आर. गिरी सर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी , विद्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, एन. सी.सी चे एस.आर.देशमुख, सौ. सानप मॅडम व त्यांचे कॅडेट , स्काउट गाईड चे आर.डी.साबळे, सौ.राठोड मॅडम व त्यांचे विद्यार्थी , हरित सेनेचे श्रीकांत घाणे सर व त्यांचे विद्यार्थी , गीत मंच, माईक सिस्टिम , रांगोळी, झाडांच्या कुंड्या , रंगकाम, फुले, विद्यालयाचे सर्व चतुर्थ कर्मचारी ,वसतिगृहाचे सर्व अधिक्षक व कर्मचारी शालेय पोषणच्या महिला कर्मचारी, वसतिगृहाचे सर्व मुले मुली या सर्वांच्या मेहनतीने अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.  कार्यक्रम प्रमुख विनोद तारू व जालिंदर आरोटे तसेच ज्यांच्या उत्कृष्ठ मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी प्राचार्य भाऊसाहेब  बनकर यांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.

तसेच गुरूवर्य रा वि पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयातील विद्यार्थिनींनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुर येथे झालेल्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या नृत्याचे सादरीकरण करून सर्व रसिकांची मने जिंकली.

75th in Sarvodaya Vidya Mandir Rajur Vidyalaya Republic Day was celebrated 

यावेळी मान्यवर आमदार डॉ . किरणजी लहामटे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री दीपकजी सरोदे साहेब  सरपंच सौ . पुष्पाताई निगळे , केंद्रप्रमुख मा श्री बाळासाहेब जाधव साहेब यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित प्राचार्य बी. के. बनकर सर पर्यवेक्षक एस आर गिरी विजय पवार व  सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी कौतुक केले.

Web Title: 75th in Sarvodaya Vidya Mandir Rajur Vidyalaya Republic Day was celebrated 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here