Home क्राईम 9 लाखांचे कर्ज अन् व्याज भरले तब्बल 50 लाख, सावकारी जाचाची संतापजनक...

9 लाखांचे कर्ज अन् व्याज भरले तब्बल 50 लाख, सावकारी जाचाची संतापजनक घटना

Nashik Crime: नऊ लाख रुपयांच्या मोबदल्यात 50 लाख रुपये परत देखील परत करून देखील वीस लाखांची मागणी सावकाराकडून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार, खाजगी सावकाराविरोधात (moneylenders) गुन्हा दाखल.

9 lakhs loan and interest paid as much as 50 lakhs, an infuriating case of moneylenders

नाशिक:  सावकारी जाचाची घटना समोर आली आहे. व्याजाने घेतलेल्या नऊ लाख रुपयांच्या मोबदल्यात 50 लाख रुपये परत देखील परत करून देखील वीस लाखांची मागणी सावकाराकडून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरात खासगी सावकाराचे मोठे पेव फुटले असून 10 ते 30 टक्के दराने पैसे देऊन त्यानंतर सावकारी पद्धतीने वसुली केली जात असल्याने अनेक कर्जदार त्रासले आहेत. अशा सावकाराच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी पाथर्डी परिसरातील गौरव जगताप व नेहा जगताप या नव दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

आता मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत घटना घडली आहे.  याबाबत पीडित सुरेश पोराला पुजारी यांनी दिलेला फिर्यादीनुसार संशयित खासगी सावकार विजय शंकरराव देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, फिर्यादी सुरेश पुजारी यांनी जानेवारी 2007 मध्ये संशयित विजय देशमुख यांच्याकडून पाच टक्के व्याजाने नऊ लाख रुपये घेतले होते.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

फिर्यादी पुजारी यांनी या नऊ लाखांच्या मोबदल्यात 2007 ते 2022 पर्यंत वेळोवेळी व्याजापोटी 44 लाख 90 हजार रुपये रोख आणि सहा लाख रुपये बँकेतून ट्रान्सफर करून असे 50 लाख 90 हजार रुपये दिले होते. तरी देखील सावकार वीस लाख रुपयांची बाकी असल्याचे सांगत पुजारी आणि त्यांच्या मुलीला वारंवार फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून पुजारी यांनी थेट पोलिसात धाव घेत खाजगी सावकाराविरोधात (Crime) गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 9 lakhs loan and interest paid as much as 50 lakhs, an infuriating case of moneylenders

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here