Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने महाराष्ट्रात पुन्हा लाईट पेटली,  संप मागे

देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने महाराष्ट्रात पुन्हा लाईट पेटली,  संप मागे

वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत (Mahavitaran Employee Strike Called Off) वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला.

See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

मुंबई: राज्यभरातील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी  खासगीकरणाच्या विरोधात 3 दिवसांचा संप पुकारला होता. यामुळे राज्यातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. यानंतर आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे.

वीज कर्मचाऱ्यांबरोबरच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. काल रात्रीपासून विजेच्या तीनही कंपन्या आहेत, यातील कर्मचाऱ्यांनी संपाची नोटीस देऊन संप सुरु केला होता. त्यांच्या मागण्यांबाबत आज कर्मचारी संघटनांशी बैठक झाली, 32 संघटना या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खासगीकरण करायचं नाही, हे स्पष्ट केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. याऊलट पुढच्या तीन वर्षात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीन वीज कंपन्यांमध्ये राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

एका खासगी कंपनीने वीज परवान्यासाठी अर्ज दाखल केला. त्यांना परवाना मिळाल्यास वीज कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल असं संघटनांचं म्हणणं होतं, पण ही त्या खासगी कंपनीचं नोटीफिकेशन होतं, आता MARC नोटीफिकेशन काढेल आणि आपली भूमिका स्पष्ट करेल.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

याशिवाय, कंत्राटी कामगारांच्या संदर्भात आताची जी भरती आहे त्यात त्यांना कुठेतरी समाविष्ट करुन घेता आलं पाहिजे, पण एज रिलॅकसेशन दिल्याशिवाय त्यांना भरती करता येणार नाही, पण यावर तोडगा काढून त्यांचा समावेश कसा करता येईल याला राज्य सरकार प्राधान्य देईल असं फडणवीस यांनी सांगितलं. कंत्राटी कामगारांना नियमाने जो पैसा मिळाला पाहिजे तो मिळत नाही, त्यावरही तोडगा काढला जाईल, असंही फडणवीस यांनी म्हंटले आहे.

Web Title: Mahavitaran Employee Strike Called Off

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here