Home बीड खळबळजनक! ३ दिवसांचं अर्भक पोत्यात भरून रस्त्यावर फेकलं

खळबळजनक! ३ दिवसांचं अर्भक पोत्यात भरून रस्त्यावर फेकलं

Breaking News | Beed: रोडच्या कडेला पोत्यात 3 दिवसाचं पुरूष जातीचं अर्भक आढळून आल्याची घटना.

A 3-day-old baby was thrown in a sack on the road

बीड: बीडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मांजरसुंबा- कपीलधार रोडच्या कडेला पोत्यात 3 दिवसाचं पुरूष जातीचं अर्भक आढळून आले. रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांना पोतं आणि त्याच्या बाजूला कुत्रे असल्याने काहीतरी गडबड असल्याचे जाणवले.

त्या व्यक्तीने कुत्र्याला बाजूला हुसकावून पाहिले. तेव्हा त्यांना पोत्यात एक लहान मुल दिसले. सदर व्यक्तीने आरडाओरडा केला आणि अन्य नागरिक तेथे जमा झाले. यावेळी नागरिकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी त्या चिमुकल्याला नेकनुर येथील स्त्री रुग्णालयामध्ये दाखल केले. येथे त्यावर उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान सध्या या चिमुकल्याची प्रकृती चांगली असून उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

Web Title: A 3-day-old baby was thrown in a sack on the road

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here