Home संगमनेर संगमनेरात विवाहितेचा विनयभंग

संगमनेरात विवाहितेचा विनयभंग

Breaking News | Sangamner:  विवाहित तरुणीचा दोनदा विनयभंग केल्याची घटना.

Marital women molested in Sangamner

संगमनेर:  एका विवाहित तरुणीचा दोनदा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांवर संगमनेर शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

 याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पीडित विवाहित तरुणी शहरातील एका सलूनमध्ये असताना तेथे अविनाश उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले) हा वस्तू घेण्यासाठी आला आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर पीडित तरुणी घरी असताना तेथे सागर वाकचौरे आला व कुटुंबियांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी पुन्हा अविनाश उगले याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. याचवेळी सागर वाकचौरे व गोकुळ वाघ (दोघेही रा. कळस, ता. अकोले) यांनी पीडित तरुणीचे पती व सासरे यांना धक्काबुक्की केली आणि पोलिसांत काय केस करायची ती कर अशी धमकी दिली.

याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी वरील तिघांविरोधात भादंवि कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. गणेश सोनवणे करत आहेत.

Web Title: Marital women molested in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here