Home अहमदनगर अहमदनगर: ७० वर्षीय वृद्ध महिलेवर तरूणाने केला अत्याचार

अहमदनगर: ७० वर्षीय वृद्ध महिलेवर तरूणाने केला अत्याचार

Ahmednagar News:  श्रीरामपूर शहरात ७० वर्षीय वृद्ध महिलेवर तरूणाने अत्याचार (abused) केल्याची खळबळजनक घटना.

A 70-year-old woman was abused by a young man

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात ७० वर्षीय वृद्ध महिलेवर तरूणाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार परिसरात समजल्‍यानंतर नागरीकांना तरूणाला चांगलाच चोप दिला.

अहमदनगर जिल्‍ह्यातील श्रीरामपूर शहरात हा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. सदर वृद्ध महिला घरात एकटीच असताना तरूणाने घरात प्रवेश केला. यानंतर तिच्यावर अत्याचार केला. वृद्धेने बचावासाठी  प्रयत्‍न केला. परंतु, वृद्धेची ताकद अपुर्ण पडली. महिलेने आरडाओरड केल्‍यानंतर परिसरातील नागरीक धावून आले. यावेळी तरूण पळून जाण्याच्‍या प्रयत्‍नात होता.

सदरचा प्रकाराची माहिती परीसरात समजताच नागरीकांनी आरोपीला बेदम चोप दिला. यानंतर त्‍याला पोलीसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

Web Title: A 70-year-old woman was abused by a young man

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here