Home क्राईम संगमनेर: मोटारसायकलच्या डिक्कीतून सात लाख रुपयांची रोकड घेऊन चोर पसार होत असताना….

संगमनेर: मोटारसायकलच्या डिक्कीतून सात लाख रुपयांची रोकड घेऊन चोर पसार होत असताना….

Sangamner Theft: मोटारसायकलच्या डिक्कीतून ६ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून पळून जाण्याच्या तयारीत असतांना दोघांचा नागरिकांनी पाठलाग करुन संगमनेर  शहर पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 6 लाख 70 हजार रूपये पोलिसांनी हस्तगत.

Theft escapes with Rs 7 lakh cash from the trunk of the motorcycle

संगमनेर: मोटारसायकलच्या डिक्कीतून ६ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून पळून जाण्याच्या तयारीत असतांना दोघांचा नागरिकांनी पाठलाग करुन संगमनेर  शहर पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून या दोघांकडून 6 लाख 70 हजार रूपये पोलिसांनी हस्तगत केले आहे. तर तिसरा आरोपी 30 हजार रूपये घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.ही घटना बुधवार (ता.7) जून रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या दरम्यान शहरातील मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली.

संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पांडुरंग यशवंत शेटे हे शहरातील मालदाड रोड सुकेवाडी येथील राहणार आहेत ते आपल्या दुचाकीच्या डिक्कीतून सात लाख रूपयांची रोकड काढत होते. दरम्यान अत्रुकुमार अबदेश यादव, अमनकुमार जगनमोहन यादव दोघेही राहणार नयाटोला जोराबगंज ता. कोढा जि. कटीहार (बिहार) व त्यांचा आणखीन एक साथीदार नाव माहीत हे तिघेजण त्याठिकाणी गेले. आणि थेटे यांच्याकडून रक्कम बळजबरीने ओढून घेवून दुचाकीवरुन पळून जात होते. मात्र थेटे यांनी आरडा- ओरड केल्याने नागरिकांसह पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले असून त्यांच्याकडून 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड हस्तगत केली आहे.

त्यांच्या तिसर्‍या साथीदाराने 30 हजार रूपयांची रक्कम चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी पांडुरंग शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 462/ 2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस साह्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहे.

Web Title: Theft escapes with Rs 7 lakh cash from the trunk of the motorcycle

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here