सिन्नर: ‘समृद्धी’च्या ३५ फूट पुलावरून कोसळली कार
Samruddhi Accident: चालकाचे नियंत्रण सुटलेली कार सुमारे ३५ फूट उंच असलेल्या पुलाच्या कठड्यावरून थेट खालून जाणाऱ्या अंडरपासच्या शिवार रस्त्यावर कोसळल्याची घटना.
सिन्नर | नाशिक: समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटलेली कार सुमारे ३५ फूट उंच असलेल्या पुलाच्या कठड्यावरून थेट खालून जाणाऱ्या अंडरपासच्या शिवार रस्त्यावर कोसळल्याची घटना सिन्नर तालुक्यातील आगासखिंड शिवारात रविवारी दुपारी घडली. कोसळलेल्या कारचा अपघातात चक्काचूर झाला. या अपघातात घनसोली, नवी मुंबई येथील तीन जण जखमी झाले आहेत.
गोयल कुटुंबातील तिघे कारने घोटीकडून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने आगासखिंड शिवारात अंडरपासच्या पुलाजवळ दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या ब्रिजच्या संरक्षक
कठड्याला कारने धडक दिली. त्यानंतर कार खालून जाणाऱ्या शिवार रस्त्यावर कोसळली. अपघातात सनरीस गोयल (५३), हेमिना गोयल (४८) व दिव्या गोयल (२४, सर्व रा. घनसोली, नवी मुंबई) हे तिघे जखमी झाले.
Web Title: A car fell from the 35 feet bridge of ‘Samriddhi’ Accident
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App