Home अहमदनगर अहमदनगर: डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर क्लिनीकमध्येच अत्याचार

अहमदनगर: डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर क्लिनीकमध्येच अत्याचार

Breaking News | Ahmednagar: उपचारासाठी क्लिनीकमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर (वय १७) डॉक्टरनेच वारंवार अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना. डॉक्टर अटकेत.

A doctor abused a minor girl in the clinic itself

अहमदनगर: उपचारासाठी क्लिनीकमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर (वय १७) डॉक्टरनेच वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील एका गावात रविवारी (दि. ११) दुपारी घडली. याप्रकरणी पौडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून डॉक्टर विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा करण्यात आला आहे. दाखल

डॉ. अंगद सदाशिव खाडे (रा. विळद, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. काल, सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस (१४ फेब्रुवारीपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. खाडे याचे नगर तालुक्यातील एका गावात क्लिनीक आहे. तो त्या क्लिनीकमध्ये येणाऱ्या रुग्णांवर

उपचार करत असतो. रविवारी दुपारी तो क्लिनीक मध्ये असताना अल्पवयीन मुलगी तेथे आली. त्याने तिच्यावर उपचार करण्याचा बहाणा करून इच्छेविरूध्द वारंवार अत्याचार केला. सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यांच्यासह पीडिताने सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

पीडिताने यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी डॉ. खाडे विरोधात अत्याचार, पोक्सो, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहा. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक भोसले करीत आहेत.

Web Title: A doctor abused a minor girl in the clinic itself

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here