Home नाशिक नाशिकच्या सराईत गुंडाचे अपहरण अन् खून, जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नाशिकच्या सराईत गुंडाचे अपहरण अन् खून, जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Breaking News | Nashik Crime: सराईत गुंडाचे मोटारीतून अपहरण करून त्याचा खून (Murder) करून मृतदेह जिल्ह्याबाहेर मोखाडा घाटात नेऊन पेटवून दिल्याची धक्कादायक घटना.

Kidnapping and murder of inn goon, dead body found in burnt condition

नाशिक : पंचवटीतून एका सराईत गुंडाचे मोटारीतून अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह जिल्ह्याबाहेर मोखाडा घाटात नेऊन पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. संदेश चंद्रकांत काजळे (३५, रा. विजयनगर, सिडको) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मित्रांनीच आर्थिक वादातून त्याचा काटा काढल्याचे बोलले जात आहे.

सराईत गुंड आणि खासगी सावकारी करणारा काजळे यास मद्याच्या नशेत असताना त्याच्या चार ते पाच मित्रांनी त्याला निमाणी बस स्थानकासमोरील एका इमारतीच्या पार्किंगमधून मारहाण करत मोटारीत डांबले होते. यानंतर मोखाडा येथे नेऊन त्याचा खून करत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासातून प्रथमदर्शनी समोर आले आहे. घटनास्थळाहून अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांनी ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार आरोपी स्वप्निल उन्हवणे यास अटक केली आहे.

पंचवटी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा शुक्रवारी (दि. ९) रात्री काजळे याचे संशयित आरोपी नितीन ऊर्फ पप्पू चौगुले (रा. मखमलाबाद रोड), रणजित आहेर व स्वप्निल उन्हवणे (२३, दोघे रा. पंचवटी), पवन भालेराव (रा. त्र्यंबकेश्वर) आणि अन्य साथीदारांनी अपहरण केले होते. मयताचा चुलतभाऊ प्रीतेश काजळे याने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. आता खुनाचा प्रकार उघड झाल्याने खुनाचे कलम वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kidnapping and murder of inn goon, dead body found in burnt condition

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here