Home सातारा क्रीडा शिक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

क्रीडा शिक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Breaking News | Satara Crime: दहावी आणि अकरावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील क्रीडा शिक्षकानं अत्याचार (abused) केल्याची घटना.

Sports teacher abused two minor girls

सातारा: साताऱ्यातील फलटण तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावी आणि अकरावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील क्रीडा शिक्षकानं अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी तुषार मोहिते या नराधम शिक्षकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा क्रीडा शिक्षक अत्याचार करुन पसार झाला आहे.

फलटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाला होता.  या अर्जाच्या चौकशी दरम्यान अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दहावीत आणि अकरावीत शिकणाऱ्या दोन मुलींवर क्रीडा शिक्षकानंच अत्याचार केल्याचं समोर आला आहे. फलटण तालुक्यातील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून हा शिक्षक कार्यरत आहे.

खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर स्वत:च्या कारमधून पीडित मुलीला घरी सोडण्याचा बहाणा करत शिक्षकानं मुलीवर अत्याचार केला. दुसरी घटना शाळेच्या आवारातील जिममध्ये घडलीय. पीडित मुलगी व्यायामासाठी जिमच्या खोलीत गेली असताना, शिक्षकानं तिच्यावर अत्याचार केला. या दोन्ही घटना डिसेंबर 2023 मध्ये घडल्या आहेत. एका पीडित मुलीनं तिच्या मावस भावाला हा प्रकार सांगितल्यानंतर तक्रार अर्ज करण्यात आला होता. या अर्जाच्या चौकशीदरम्यान या अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी करण्यात आली. त्यामध्ये तथ्य आढळून आले. याप्रकरणी महिला पोलीस काॅन्स्टेबलनं फिर्याद दिलीय. संबंधित शिक्षक फरार झाला असून आम्ही त्याचा कसून शोध घेत आहोत. – विशाल वायकर, सहायक पोलीस निरीक्षक

याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे.  फिर्यादीवरुन शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून संबंधित शिक्षक फरार झाला आहे.  फलटण ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Web Title: Sports teacher abused two minor girls

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here