Home महाराष्ट्र चार वर्षीय चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार, शिपायाकडून घृणास्पद कृत्य

चार वर्षीय चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार, शिपायाकडून घृणास्पद कृत्य

Breaking News | Rape Case : एका चार वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

A four-year-old girl was sexually assaulted at school

कांदिवली: चार वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली  पूर्व समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका चार वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नराधमाने शाळेतच चिमुकलीवर अत्याचार केला. शाळेतील कर्मचाऱ्याने हे घाणेरडे कृत्य केले आहे.

शाळेतील कर्मचाऱ्याने मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  कांदिवली अशोक नगर येथील लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये शिकणारी चार वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे वडिलांसोबत 2 फेब्रुवारीला शाळेत गेली. शाळेतून पुन्हा घरी आल्यानंतर तिच्या पोटात लागल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलीने सांगितलं की, शाळेचे काका तिला बाथरूममध्ये घेऊन गेले. चॉकलेटच्या बहाण्याने त्याने तिच्यावर अत्याचार केला. आईने तात्काळ पीडित मुलीला रुग्णालयात नेले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडे एका खाजगी शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक आता आक्रमक झाले असून पालकांकडून शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: A four-year-old girl was sexually assaulted at school

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here