फेसबुकवरील मैत्रीतून विवाहितेला लॉजवर बोलावून बलात्कार- Raped
Woman raped: विवाहितेला लॉजवर भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर बलात्कार, अश्लील फोटो काढून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल, एकाला अटक.
पुणे: फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका तरुणाने विवाहितेला लॉजवर भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील फोटो काढून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अतुल अशोक इंदलकर (वय २५, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात २६ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२२ यादरम्यान घडलेला आहे.
Earn Money Online | बना लखपती ऑनलाईन काम करून, फक्त करा हे काम, एकदम सोपे आणि सहज मार्ग
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेची फेसबुकवरून अतुल इंदलकर याच्याशी ओळख झाली. त्यानंतर तरुणाने महिलेस हांडेवाडी येथे एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावून अत्याचार केले. अश्लील फोटो काढून तिच्या पतीला व नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देत असे. यामुळे त्रस्त महिलेने याबाबत महिला सहायक पोलिस निरीक्षक एस तावडे तपास करत आहेत.
Web Title: a married woman was raped at a lodge through an acquaintance on Facebook
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App