Ahmednagar Bribe Case: दुकानात मीटर लावून देण्याकरिता मागितली २ हजारांची लाच, तडजोड करून १ हजारांची लाच स्वीकारताना वायरमन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
राहता: नव्याने सुरु केलेल्या बेकरी दुकानात मिटर लावून देण्याकरिता आरोपी लोकसेवक धनंजय गोरख आग्रे या वायरमनने तक्रारदाराकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजुरी येथे तक्रारदार यांनी नव्याने बेकरी सुरू केलेली आहे. त्यासाठी त्यांनी व्यावसायिक वीज जोडणी घेतली आहे. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेले नवीन विद्युत मिटरसाठी अधिकृत कोटेशन व शुल्क भरले आहे. ते मीटर बसवून घेण्याकरिता आरोपी धनंजय आग्रे यांनी तक्रारदाराकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली.
Earn Money Online | बना लखपती ऑनलाईन काम करून, फक्त करा हे काम, एकदम सोपे आणि सहज मार्ग
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, पो. अंमलदार बाबासाहेब कराड, चालक पो. ह. हरुण शेख यांनी बुधवारी राजुरीत सापळा लावला. आरोपीला तडजोडीअंती ठरलेली 1 हजार रुपयांची लाच तक्रारदाराने दिली. त्याने ती स्विकारल्यानंतर सापळा लावलेल्या अधिकार्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्यावर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.
Web Title: Wireman caught in anti-bribery department’s net while accepting bribe
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App