अहमदनगर ब्रेकिंग! उभ्या कारने घेतला अचानक पेट
Breaking News | Ahmednagar: अपघातामधील उभ्या असलेल्या मारुती सुझुकी कारने अचानक पेट घेतल्याची घटना.
श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथील पोलीस निवारा कक्ष या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी अपघातामधील उभ्या असलेल्या मारुती सुझुकी कारने (एमएच २० बीक्यू ५०५५) अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून अपघातामुळे ही कार हरेगाव फाटा येथील पोलीस निवारा कक्ष येथे उभी होती. यामधील जखमी व्यक्ती हे उपचार घेत असल्याने वाहन नेण्यासाठी ते येऊ शकले नाही. सकाळी गाडीमधून हळूहळू धूर निघत असल्याने रस्त्यावरील महिला प्रवासी यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे वायरींग तसेच आतील सिट कव्हरने पेट घेतल्याने आगीचा डोंब निर्माण झाला होता. पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो.कॉ प्रविण कांबळे तसेच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला.
Web Title: A parked car caught fire suddenly
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News