Home बीड पतंग काढताना गॅलरीतून तोल गेला; ९ वर्षीय चिमुकला जीवाला मुकला

पतंग काढताना गॅलरीतून तोल गेला; ९ वर्षीय चिमुकला जीवाला मुकला

Breaking News: गॅलरीत अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या एका ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू (Death) झाल्याची घटना.

balance went through the gallery while drawing the kite A 9-year-old boy lost his life

बीड: मकरसंक्रातीचा सण आठवडाभरावर असला तरी, अनेकांनी आतापासून पतंग उडवण्यास सुरुवात केली आहे. सुट्टीच्या वेळी चिमुकले पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. अशातच बीडमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. गॅलरीत अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या एका ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Accidental Death) रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड शहरातील  शहरातील पांगरी रोड परिसरात राहणाऱ्या कृष्णा दिलीप तकीक यांचा मुलगा रविवारी आपल्या गच्चीवरून पतंग उडवत होता.

दरम्यान, सांयकाळच्या वेळेस त्याचा पतंग गच्चीवरील तारांमध्ये अडकला. अडकलेला पतंग काढण्यासाठी चिमुकला गॅलरीत गेला असता, तोल जाऊन तो खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, मृत चिमुकल्यावर रविवारी रात्री उमरद जहॉगिर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उमरद जहॉगिर व खापर पांगरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: balance went through the gallery while drawing the kite A 9-year-old boy lost his life

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here