Home अहमदनगर राज्यातील पहिलीच घटना: शिर्डीतील सहा महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू

राज्यातील पहिलीच घटना: शिर्डीतील सहा महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू

A six-month-old girl from Shirdi died of mucormycosis

राहता | Ahmednagar: कोरोनाशी लढत असतांना महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसने विडा घातला आहे. अहमदनगर मध्ये अवघ्या सहा महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने (mucormycosis)मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहता तालुक्यातील लोणी प्रवरा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र दुर्दैवाने तिला हिरावून घेतले आहे.

प्रवरा हॉस्पिटल मध्ये १३ जूनला तिला दाखल करण्यात आले होते. शिर्डी येथे राहणाऱ्या कोरके यांच्या कुटुंबातील सहा महिन्याच्या श्रद्धा कोरके हिला कोरोनाची लक्षणे होती. नाशिक येथे उपचार सुरु होते. म्युकरमायकोसीसचे लक्षणे आढळून आल्याने कुटुंबियांची पायाखालची वाळू सरकली. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते.  म्युकरमायकोसीसने शरीरात जास्त प्रमाणात पसल्याने सर्जरी करणे अशक्य होत. दुर्दैवाने आज सकाळी तिचा मृत्यू झाला. इतक्या लहान वयात म्युकरमायकोसीसने मृत्यू होण्याची कदाचित राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेण्याचे अवाहन डॉ. भालवार यांनी केले.  

Web Title: A six-month-old girl from Shirdi died of mucormycosis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here