अहमदनगर ब्रेकिंग: शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
Ahmednagar News: एक शिक्षकाने तो शिकवत असलेल्या शाळेतील एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार (abused) केल्याचा प्रकार उघडकीस.
जामखेड | Jamkhed: जामखेड तालुक्यातील साकत येथे राहणार्या एक शिक्षकाने तो शिकवत असलेल्या शाळेतील एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिक्षकास अटक करण्यात आली असून न्यायालयाने 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर (30, रा.साकत, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरूमकर याने आपल्याच शाळेत शिकत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन पीडितेस शाळेच्या अभ्यासाच्या माध्यमातून तिच्याशी स्नॅपचॅट अॅपच्या माध्यमातून जवळीक साधून बालकास अर्धनग्न फोटो पाठविण्यास सांगितले.
ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन जानेवारी 2023 ते 14 जून 2023 पर्यंत वेळोवेळी पीडित बालिकेस आष्टी येथील हर्षद लॉज येथे नेऊन तीच्याशी बळजबरी केली. पोलिसांनी त्यास अटक केली असून, बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासह पालकांमध्ये व्देषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: A teacher abused a minor student
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App