गंगामाई घाटावर अकोलेतील तीन युवक बुडाल्याची घटनेतील वाचलेल्या युवकाने संपविली जीवनयात्रा
Akole News: महाविद्यालयीन युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
अकोले: धुमाळवाडी येथील महाविद्यालयीन युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुमारे १५ दिवसांपूर्वी संगमनेर शहराजवळ प्रवरा नदी पात्रात गंगामाई घाटावर अकोले येथील तीन युवक बुडाल्याची घटना घडली होती. त्यावेळी दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकास वाचविण्यात यश आले होते. त्या घटनेत वाचलेल्या धुमाळवाडी येथील युवराज नवनाथ धुमाळ (वय १९) या महाविद्यालयीन युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. बुधवारी युवराज धुमाळ याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Web Title: college youth committed suicide by hanging himself at his residence
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App