Home Suicide News रात्री वाढदिवस साजरा केला अन् पहाटे गळफास घेतला, एकुलता एक मुलगा अन…

रात्री वाढदिवस साजरा केला अन् पहाटे गळफास घेतला, एकुलता एक मुलगा अन…

Ahmednagar News:  नगर तालुक्यातील २५ वर्षीय युवकाची आत्महत्या.

Celebrated the Birthday at Night and Hanged Suicide in the Morning

नगर: वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच २५ वर्षीय युवकाने घरातील छताला दोरीच्या साहाय्याने गळफास आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील खंडाळा गावात बुधवारी (दि. २१) पहाटे घडली. रात्रीच त्याने मित्रांसमवेत वाढदिवस साजरा केला अन् पहाटे गळफास घेतला.

गोरख शांतीलाल कांबळे (वय २५, रा. खंडाळा, ता. नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे. गोरख कांबळे हा युवक अॅल्युमिनियमच्या विंडो तयार करण्याचा व्यवसाय करत होता. मंगळवारी (दि.२०) त्याचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री त्याच्या मित्रांनी वाढदिवस साजरा केला. बुधवारी (दि.२१) पहाटे २.४५ च्या सुमारास त्याने त्याच्या व्हॉटस्अॅप स्टेटसवर वाढदिवसाचा शुभेच्छा देणाऱ्यांच्या आभाराची पोस्ट टाकली होती. तसेच रात्री त्याने काही मित्रांना आपण उद्या सकाळी लवकरच मोहटादेवी दर्शनासाठी जाऊ, असे सांगितले होते. त्यामुळे पहाटे ५.३० च्या सुमारास काही मित्रांनी त्याला फोन लावले. मात्र त्याने फोन उचलले नाहीत.

त्यामुळे मित्र त्याला घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. घराच्या दरवाजाला आतून कडी होती. मित्रांनी त्याला आवाज दिला मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा मित्रांनी खिडकीतून आत डोकावले असता तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मित्रांनी व परिसरातील नागरिकांनी त्याला नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यास मृत घोषित केले.

त्याच्या मागे आई, वडील असून तो एकुलता एक होता. जिल्हा रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर दुपारी खंडाळा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Celebrated the Birthday at Night and Hanged Suicide in the Morning

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here