Home नाशिक प्रेमभंगातून इंजिनिअरने गोळी झाडून केली आत्महत्या

प्रेमभंगातून इंजिनिअरने गोळी झाडून केली आत्महत्या

एमआयडीसीतील एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअरने  गावठी कट्ट्यामधून स्वत:च्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

engineer committed suicide by shooting himself due to a love affair

नाशिक रोड: सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या संदीप नाना सहाणे (२९) यांनी गावठी कट्ट्यामधून स्वत:च्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. प्रेमभंगातून त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे बोलले जात आहे. सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील संदीप याचे वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप नाना सहाणे (वय २९)(राहणार कृष्णा कॉलनी, भगवा चौक, चेहेडी, नाशिक रोड ) असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

सकाळी त्याने पळसे येथील दारणा नदीजवळ असलेल्या भैरवनाथ मंदिर येथे बंदुकीच्या सहाय्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर सदरची घटना नातेवाईक व नागरिकांना समजताच त्यांनी नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली.

यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे तातडीने दाखल झाले व झालेल्या घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला. संदीप हा एम. आय. डी. सी. येथे एका कंपनीत कामाला होता वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते.

Web Title: engineer committed suicide by shooting himself due to a love affair

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here