अकोले तालुक्यात झोळीत झोपलेल्या बालिकेचे अपहरण
Breaking News | Akole: एक वर्षाच्या मुलीचे झोळीतून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना.
अकोले : एक वर्षाच्या मुलीचे झोळीतून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील बेलापूरगावातील धरण परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (२९) रोजी रात्री १२: ३० वाजेच्या सुमारास आदिवासी ठाकर समाजाच्या शेतकरी कुटुंबात हा प्रकार घडला. बेलापूरगावात आदिवासी ठाकर समाजातील शेतकरी महिला सारिका सुनील मेंगाळ व पती सुनील, सासू- मथुरा, सासरे सोमनाथ, मुलगा सार्थक व अपहृत एक वर्षाची लहान मुलगी वैष्णवी असे कुटुंब राहते. वाट्याने शेती करणे व मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
गुरूवारी (२८) रोजी कुटुंबियांनी दिवसभर कांदे काढण्याचे काम केले. संध्याकाळी जेवण केले. वैष्णवीला आई सारिका हिने दूध पाजून झोळीमध्ये झोपी लावले. यानंतर कुटुंब झोपले. दरम्यान, शुक्रवारी (२९) रोजी रात्री १२: ३० वाजता पती सुनील लघुशंकेला उठले असता वैष्णवी झोळीत झोपली दिसली, परंतु पहाटे ३ वाजेच्या दरम्यान वैष्णवीची आई सारिका पाणी पिण्यास उठली असता वैष्णवी झोळीत नसल्याचे निदर्शनास आले. तिने पती सुनील यास उठवून वैष्णवी झोळीत नसल्याचे सांगितले. आजूबाजूच्या परिसरात सैरभैर होत त्यांनी शोध घेतला. सकाळी नातेवाईकांकडे चौकशी केली, परंतु वैष्णवी मिळाली नाही. अखेर मेंगाळ कुटुंबाने अकोले पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.
Web Title: Abduction of a girl sleeping in a hammock in Akole taluka
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study