Home अहमदनगर अहमदनगर: मढी यात्रेत दुर्दैवी घटना, एकाचा मृत्यू

अहमदनगर: मढी यात्रेत दुर्दैवी घटना, एकाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: कानिफनाथ यात्रेदरम्यान एका भाविकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना.

Unfortunate incident in Madhi Yatra, one dies

पाथर्डी: तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रेदरम्यान एका भाविकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला असून, गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हात की सफाई दाखवत सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. जितेंद्र सुखदेव पाटील (वय ३५, रा. मोगण, जि. धुळे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रंगपंचमीच्या दिवशी लाखो नाथभक्त मढी येथे कानिफनाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. अनेक भाविक मढी गावातील परिसरात असणाऱ्या वस्ती व शेतात ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी जाऊन स्नान करणे अथवा पिण्यासाठी पाणी आणतात. गावातील श्रीराम विश्वनाथ पाखरे यांच्या शेत गट नंबर ६६६ मधील विहिरीत पडून जितेंद्र पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली.

या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शुभांगी दीपक झावरे (भोंदे, ता. पारनेर) व त्यांचे पती शनिवारी सकाळी आठच्या सुमारास कानिफनाथ गडावर मंदिराबाहेरून दर्शन घेतले. त्यानंतर शुभांगी झावरे यांच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे एक तोळ्याचे मिनी गंठण चोरी गेले. त्याचप्रमाणे विष्णू येडुबा वजरे, सीता विष्णू वजरे (रा. सातारा परिसर बायपास, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पती-पत्नी आपल्या कुटुंबासह शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कानिफनाथ मंदिराच्या कळसाला देवाची काठी लावत असताना विष्णू वजरे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी व सीता वजरे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी चोरले. काही भाविकांचे मोबाईल व किरकोळ सोन्याचे दागिने चोरीस गेले.

Web Title: Unfortunate incident in Madhi Yatra, one dies

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here