Nashik Crime News: आई-वडिलांवर दबाव आणण्यासाठी स्वतःच्या हातावर चाकू मारून घेत अल्पवयीन मुलीला पळून नेल्याची धक्कादायक घटना (Abduction of a minor girl).
नाशिक : मुलीने भेटण्यास नकार दिल्यानंतर आई-वडिलांना व भाऊ- बहिणींना बघून घेण्याची धमकी देत मुलीच्या आई-वडिलांवर दबाव आणण्यासाठी स्वतःच्या हातावर चाकू मारून घेत अल्पवयीन मुलीला पळून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित राजरत्न भवाळे याच्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी व संशयित भवाळे याची काही महिन्यांपासून ओळख होती. परंतु ही बाब मुलीच्या आई- वडिलांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी दोघांना एकमेकांना भेटण्यास मनाई केली होती.
रविवारी दुपारी मुलीच्या आई- वडिलांनी भवाळे याच्या आई-वडिलांना व नातेवाइकांना बोलवून सर्व प्रकार सांगत होते. त्यावेळी भवाळे याने त्याच्याजवळील चाकूने स्वतःच्या हातावर मारून घेत मुलीच्या आई- वडिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून मुलीला पळवून नेले.
Web Title: Abduction of a minor girl in front of her parents
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App