Nashik: दोन दिवसांत लागोपाठ भूकंपाचे पाच धक्के (Five earthquakes) बसल्याने या धक्क्यांनी ग्रामस्थ भयभीत.
नाशिक : दिंडोरी तालुक्याच्या पाठोपाठ गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील राशा, गुही या गावांना गेल्या दोन दिवसांत लागोपाठ भूकंपाचे पाच धक्के बसल्याने या धक्क्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. नाशिकच्या भूकंप मापन यंत्रावर या धक्क्यांची नोंद झाली असून, साधारणतः ६५ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदविला गेला आहे.
शनिवारी व रविवारी लागोपाठ पाच धक्के बसले आहेत. रिश्टर स्केलवर २.४ ते २.८ महत्ता असलेल्या या भूकंपाचे धक्के ग्रामस्थांना चांगलेच जाणवले आहेत. शनिवारी रात्री दोन वाजता त्यानंतर रविवारी सकाळी दहा वाजता, दुपारी पावणेदोन वाजता व लगेचच अर्ध्या तासाने पुन्हा धक्का जाणवला. या धक्क्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले असून उलट सुलट चर्चा समोर येत आहेत.
Web Title: Five earthquakes in this taluk for two consecutive days, villagers are scared