Home अहमदनगर अहमदनगर: एकाच वेळी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

अहमदनगर: एकाच वेळी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

Breaking News | Ahmednagar: जेवणाच्या बहाण्याने एकाच वेळी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची घटना.

Abduction of three minor girls at the same time

शेवगाव: जेवणाच्या बहाण्याने एकाच वेळी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची घटना चेडेचांदगाव येथे घडली असून मुलींच्या तपासासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. गावातील पाटलाच्या घरी देवीच्या सवाष्णी आहेत, तेथे जेवण्यासाठी मुलींना घेऊन जातो, असे सांगून शुक्रवार (दि. १९) दुपारी चेडेचांदगाव येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत मुलींच्या पालकांनी चौकशी केली असता गावातील पोपट शहादेव बोरुडे याने सदर मुलींचे दुचाकीवरून अपहरण केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपट शहादेव बोरुडे (वय २२) याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हकिकत अशी की, चेडेचांदगाव येथील पती व पत्नीआज शुक्रवारी (ता. १९) आपल्या तीन मुली व एक मुलास घरी आईकडे सोडून कौटुंबिक कामासाठी गुळज येथे गेले होते. त्या वेळी दुपारच्या सुमारास गावातील पोपट बोरुडे हा तेथे येऊन गावात पाटलाच्या घरी देवीच्या सवाष्णी आहेत, त्यासाठी मुलींना जेवायला घेऊन जातो असे सांगून तेथील १० व १२ वयाच्या दोन तर शेजारील १२ वयाची एक मुलगी अशा एकाच वेळी तीन मुलींना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून घेऊन गेला. गावातील जगन्नाथ पाटोळे यांनी बोरूडे हा दुचाकीवरून तीन मुलींना अहमदनगरकडे घेऊन जाताना पाहिले. त्यानंतर पाटोळे यांनी मुलीच्या पालकास याबाबतची माहिती फोनवरून दिली. संबंधित मुलींच्या वडिलांनी खात्री केली असता रात्री उशिरापर्यंत मुली घरी परतल्या नसल्याने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून बोरुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Abduction of three minor girls at the same time

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here