Home क्राईम धक्कादायक! हातमजूर विवाहितेवर सामूहिक अत्याचार

धक्कादायक! हातमजूर विवाहितेवर सामूहिक अत्याचार

Dhule Crime News :  अज्ञातस्थळी नेऊन  व तेथे दोघा नराधमांनी सामूहिक अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घडली आहे.

abuse of married manual laborers

धुळे:  अंजनविहिरे (ता. शिंदखेडा) येथील 30 वर्षीय हातमजूर विवाहितेस बसमध्ये बसवून देतो, असे सांगत दुचाकीवरून चिमठाणे मार्गावरील अज्ञातस्थळी नेले व तेथे दोघा नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना बुधवारी (ता. ५) रात्री ११ वाजेच्या  सुमारास घडली.

या प्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असून, त्याला शिंदखेडा न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दुसऱ्या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. तरुण विवाहितेने गुरुवारी (ता. ६) रात्री शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की,  पाच जुलैला रात्री अकराच्या सुमारास शहादा येथील ओळखीचे केटरर्स राजू राजनी (पूर्ण नाव माहीत नाही) केटरिंग कामासाठी सवाई-मुकटी (ता. शिंदखेडा )  येथे मोटाररसायकलीने जात होते.

त्यांची मोटारसायकल दोन तरुणांनी अडविली. राजू राजनी याला पळवून लावले. नंतर नराधम तरुणांनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तिला बसमध्ये बसवून देतो, असे सांगत तिला मोटारसायकलवरून चिमठाणे मार्गालगत दलवाडे (प्र. सोनगीर) शिवारातील लाइट टॉवरजवळ नेले. तेथे तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला.

शिंदखेडा पोलिसांनी तपासचक्रे फिरवत पंकज संजय पवार (वय २९, रा. वरझडी) याला गुरुवारी रात्री वरझडी येथून अटक केली. त्याला शिंदखेडा न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक प्रशांत गोरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पवार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: abuse of married manual laborers

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here